पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi

Rainy Season Essay In Marathi पावसाळा हा एक असा ऋतू आहे ज्या ऋतूमध्ये सर्व निसर्गसौंदर्य फुललेले असतं आणि हा सर्वात मन मोहून टाकणारा ऋतू आहे आणि या पावसातच निसर्गातील खूप सुंदर असे बदल होत असतात. पावसाळ्याबद्दल आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये निबंध लिहिला आहे आणि या निबंधामध्ये तुम्हाला पावसाळा बद्दलचे सर्व वर्णन अगदी सोप्या भाषेत केलेले मिळेल.

v
Rainy Season Essay In Marathi

पावसाळा हा ऋतू जेव्हा चालू होतो तेव्हा सर्वत्र उन्हाने तापलेली झाडेझुडपे आणि जमीन असते आणि ज्यावेळी पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडतो तेव्हा जमिनीतून एक वेगळ्या प्रकारचा मन मोहून टाकणारा सुगंध येतो तो खूप जास्त आकर्षित करतो.

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi

आपल्याला निसर्गाकडे आणि याच बरोबर पहिल्या पावसाच्या वेळी जंगलातील सर्व झाडाझुडपांना उन्हाळ्यानंतर पाणी मिळाले असते त्यामुळे सर्वत्र झाडे हळूहळू हिरवी होत असतात आणि हे निसर्गरम्य दृश्य खूप सुंदर बनवते या पावसाळ्यात ऋतूला पावसाळ्यात सर्वत्र पाऊस चालू असल्याकारणाने घराबाहेर पडायला मिळत नाही पण पावसाळ्यात घरात बसून बाहेरचा पाऊस बघायला खूप जास्त आनंद वाटत असतो .

हाच आनंद आपल्याला पावसाळा ऋतु मध्ये मिळतो ह्या ऋतूत सर्वत्र पक्ष्यांची किलबिल सुरू असते आणि याचा एक वेगळा असा आवाज आपल्या कानाला मोहून टाकतो नदी च्या पूर्ण पात्रातून पाणी वाहत असते आणि त्या नदीच्या वाहणाऱ्या पाण्यात  एक वेगळीच मजा येते आणि त्याच बरोबर ज्या विहिरी उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून गेलेल्या असतात त्या विहिरी मध्ये पावसाळ्यामध्ये पाणी भरते आणि त्या विहिरी मध्ये ही पोहण्याची एक वेगळीच मजा असते

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi (४०० शब्दांत)

पावसाळ्यात पाऊस जास्त असेल तर शाळेला सुट्टी देखील मिळते आणि याच मुळे सर्व शाळेतल्या मुलांना घरी बसून पावसाची पडणारी रिमझिम बरसात याची मजा घेता येते.

पावसाळा हा ऋतू आपल्या भारत देशात साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात चालू होतो आणि हा पावसाळा सप्टेंबर महिन्यापर्यंत चालू असतो आणि या सर्व ऋतूमध्ये तीन महिने पाऊस पडत असतो आणि हा ऋतू उन्हाळा ऋतु नंतर येतो जेणेकरून उन्हाळ्यात जी जमीन तापलेली असते.

वातावरणात तापमान वाढ झालेली असते ही सर्व तापमान वाढ या पावसाळा ऋतू मुळे कमी होते आणि निसर्गामध्ये एक हिरवीगार वनस्पतींच्या पानांची चादर टाकून जाते.

उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकणारे वन्यप्राण्यांना पावसाळ्यात पाण्याची संपूर्णतः मिटून जाते कारण जंगलामध्ये परत एकदा पाणी साठते आणि पाण्याची कमतरता वन्यप्राण्यांना भासत नाही आणि त्याच बरोबर पावसाळा आल्यानंतर वन्य पक्षी किलबिलाट सर्वत्र करत असतात आणि त्यांचा आवाज मनाला मोहून टाकतो.

पावसाळ्यातील एक आणखीन विलोभनीय गोष्ट म्हणजे पावसाळ्यात जो विजांचा गडगडाट होतो तो मनाला मोहून टाकतो आणि पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून पावसाचे स्वागत करतात आणि पावसाच्या सरी बरसल्यावर ते सुंदर नृत्य करतात आणि आपला सूर्य ढगांच्या आड लपून जातो आणि सर्वत्र एक वेगळाच प्रकाश पसरतो.

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi (३०० शब्दांत)

त्याच प्रकाशामध्ये कुठेतरी एका बाजूला सुंदर असा इंद्रधनुष्य आकाशात कोरलेला असतो आणि उन्हाळ्यामध्ये सुकून गेलेल्या नद्या विहिरींना पावसाळ्यामध्ये एक वेगळेच रूप घेऊन जाते नद्या दुथडी भरून वाहू लागतात सर्व विहिरींचे पाणी काठोकाठ भरून जाते.

पावसाळ्यामुळे आपल्या वातावरणात खूप सारे बदल होतात जसे भौगोलिक हालचालींवर अति खूप जास्त परिणाम पावसाळा या ऋतु चा पडतो जसे की सर्व वातावरणात वारा पसरलेला असतो आणि याच वाऱ्यांमुळे ढग गोळा होऊन पावसाचे प्रमाण खूप जास्त वाढलेली असते.

पावसाचे आगमन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होते आणि या पावसाला मान्सून असे म्हटले जाते आणि हा मान्सून केरळ राज्य पासून सुरुवात होतो आणि मुंबईमध्ये मान्सूनचा शेवट होतो आणि भारत देश हा खूप भाग्यवान देश आहे.

की ज्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा असे तिन्ही ऋतू चे दर्शन एकाच वर्षात होते कारण इतर देशात जर तुम्ही बघितले तर तिन्ही ऋतू एकाच वर्षात कधी येत नाहीत कुठे वर्षभर फक्त हिवाळा तर कुठे वर्षभर नुकतेच ऊन आणि तर कुठे वर्षभर फक्त पावसाळा असतो त्यामुळे सर्व ऋतूंचा अनुभव घेता येत नाही तिथल्या भागातल्या व्यक्तींना

या ढगांमुळे जो सूर्यप्रकाश असतो तो देखील ढगांच्या आड दडलेला असतो आणि त्याच सूर्यप्रकाशामुळे इंद्रधनुष्याची निर्मिती देखील होते आणि हा इंद्रधनुष्य एक निसर्गाचा खूप मौली असा दृश्य आहे अरे याच बरोबर आपल्या शेतकरी राजा ची शेती साठी जी पाण्याची मोठी आवश्यकता असते ती सर्व वर्षभराची पाण्याची आवश्यकता या पावसामुळे पूर्ण होऊन जाते.

या पावसाचे पाणी बंधाऱ्यात द्वारे आणि विहिरीद्वारे शेतकरी साठवतात आणि हेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतासाठी वर्षभर वापरले जाते त्याच्यामुळे या पावसाळा ऋतु चे शेतीसाठी खूप मोठे महत्त्व आहे यामुळे शेतकरी अन्न पिकवू शकतो पावसाळा जवळ सुरू होतो तेव्हा शेतीची सुरुवात होते तेव्हाच भात लावण्यास शेतकरी चालू करतो. याच्यामुळे पावसाळा ऋतु शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरतो.

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi (२०० शब्दांत)

पाऊस जसा आपल्या निसर्गासाठी लाभदायक आहे तसा थोडासा हानीकारक देखील आहे जसे की अतिवृष्टीमुळे आपल्या गावात त्यांच्या बाजूच्या असणाऱ्या नदीला पूर येण्याची शक्यता आहे आणि जर नदीला पूर आला तर गावांमध्ये पाणी घुसून गावाचे आणि मानवी वस्तीचे खूप मोठे दुस्तान होण्याची शक्यता असते.

त्याच बरोबर पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे होणारे कावीळ सारखे रोगांची खूप जास्त भीती असते कारण जर पिण्याच्या पाण्यामध्ये जरादेखील घाण अर्जुन पाणी दूषित झाले तर लोकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि याच बरोबर पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे सांडपाणी जमिनीमध्ये मुरत नाही.

याच मुळे या सांडपाण्यात डेंग्यूसारख्या मच्छरांची पैदास होऊन डेंगूची रोग गावात पसरण्याची भीती असते आणि पावसाळ्यात जर अतिवृष्टी झाली तर ते शेतीसाठी देखील लाभदायक नसते यामुळे शेतातील पीक सोडून जाते आणि शेतीचे खूप सारे नुकसान होते यामुळे पावसाळा हा एक मानवी जीवनासाठी खूप सुंदर असा ऋतू आहे या ऋतूत निसर्गामध्ये खूप सारे बदल होत असतात.

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi (१०० शब्दांत)

पावसाळ्यात रिमझिम पडणारा पाऊस आणि सर्वत्र सोसाट्याने वाहणारे वारे मनाला अगदी सुन्न करून ठेवते आणि याच पावसाळा ऋतु मध्ये निसर्गाला एक वेगळाच बहर येतो आणि सर्व निसर्ग फुलून जातो पक्षांचा किलबिलाट चारी बाजूला होत असतो.

त्याच बरोबर शेतातून वाहणारे झुळझुळ पाणी खूप छान असते त्याचबरोबर आकाशात सात रंगाचा चमकणारा इंद्रधनुष्य आणि पावसा मध्ये एका पायावर नृत्य करणारा मोर हे सर्व डोळे दिपवून टाकणारे दृश्य फक्त आपल्याला पावसाळा या ऋतु तच बघायला भेटते .

उन्हाळ्यात ऊन खूप जास्त असल्याकारणाने मनुष्यही खूप उकाड्याने हैराण झालेला असतो आणि त्याच वेळी पावसाचे आगमन होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: वाह बेटे मौज करदी..!!!